जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बी. नारायणा फाऊंडेशनचा वृक्षारोपण उपक्रम

Tree Plantation

५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे विशेष वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कडुलिंब आणि करंज यांसारख्या बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष मोठ्या प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) निर्माण करतात तसेच दाट सावली प्रदान करतात. शिवाय, कडुलिंब आणि करंज ही झाडे जलद गतीने वाढणारी असून दीर्घकालीन पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. वाढते तापमान, प्रदूषण आणि घटत चाललेले हरित क्षेत्र या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमातून “आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीच्या निरोगी जीवनाची गुंतवणूक आणि जागतिक तापमानवाढीवर मात करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल” हा संदेश देण्यात आला.

यावेळी फाऊंडेशनने केवळ वृक्षारोपण करून थांबून न जाता, लावलेल्या रोपांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले आणि सर्वांनी वृक्षांची नियमित काळजी घेण्याचे आवाहन केले.

फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. शंकर बटगिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “माझ्या नावाचे एक झाड” हा संकल्प करून प्रत्येकाने आपल्या परिसराला हिरवाईने नटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी सोसायटीचे सचिव श्री. दिनकर नारायणकर यांनीही उपस्थितांना संबोधित करत वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन यांचे महत्त्व विशद केले.

 

या कार्यक्रमाला श्री. नरसिंग म्हंता, श्री. निखिल बटगिरी, श्री. संजीव सानी, श्री. मनीष बटगिरी, श्री. सागर बटगिरी, श्री. अनिल कुलकर्णी, श्री. रेवप्पा काळे, श्री. दिनकर नारायणकर, श्री. मल्लिनाथ आचलेरकर, श्री. विठ्ठल पवार, श्री. काळशेट्टी, श्री. सुनील भैरमदगी, श्री. साईनाथ रासोळगीकर, श्री. सुनील शिंदे, श्री. ईश्वर लोकरे तसेच सोसायटीतील लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post:

Related Posts:

Scroll to Top

Thank you for contacting us.

You can also connect us at: